वडापुरीत पावसामुळे गुलछडी पाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडापुरीत पावसामुळे गुलछडी पाण्यात
वडापुरीत पावसामुळे गुलछडी पाण्यात

वडापुरीत पावसामुळे गुलछडी पाण्यात

sakal_logo
By

वडापुरी, ता. २३ : इंदापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगला फायदा झाला मात्र सतत पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साठल्याने गुलछडी तोडता येत नसल्याने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षात फुलांना दर नसल्याने फूल उत्पादक शेतकरी अडचणीत होता, परंतु वर्षी तरी सण असल्याने फुलांना दर चांगला मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साठवून राहिल्याने फुले तोडता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्या एक किलोच्या गुलछडीचा एक ढिग वीस ते पन्नास रुपया पर्यंत जात असल्याने गुलछडीच्या बागेला केलेला खर्च, मजुरांचा खर्च व फुलांचे निघणारे उत्पन्न याचा विचार केला असता फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आला असल्याचे मत सायबू शेख यांनी व्यक्त केले.

01666