
रेडणीच्या सरपंचपदी हिराबाई खाडे
वडापुरी, ता. २१ : रेडणी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई देविदास खाडे या विजयी झाल्या आहेत. भाजप पुरस्कृत पॅनेलच्या हिराबाई देविदास खाडे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी लेझीम पथकासह, गुलाल उधळत गावातून मिरवणूक काढली व आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.
चौरंगी लढतीत रेडणी ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यापैकी खाडे यांच्या पॅनेलचे सहा उमेदवार निवडून आले. तर विरोधकांचे पाच उमेदवार निवडून आले. विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- शहाजी तरंगे, कोमल लोंढे, मुक्ताबाई काळकुटे, सचिन काळे, प्रफुल्ल चव्हाण, पुष्पा काळकुटे, सुभाष शिर्के, सविता सोनटक्के, स्वाधीन खाडे, पुनम हाके, लक्ष्मीबाई तरंगे.
यावेळी खाडे यांनी सांगितले की, जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले आहे. त्या विश्वासाने गावातील विकास कामे केली जाती. तसेच निवडून आलेल्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त विकास कामे करून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.