गावातील स्वच्छतेचे सातत्य गरजेचे : परीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावातील स्वच्छतेचे सातत्य गरजेचे : परीट
गावातील स्वच्छतेचे सातत्य गरजेचे : परीट

गावातील स्वच्छतेचे सातत्य गरजेचे : परीट

sakal_logo
By

वडापुरी, ता. २५ : ‘‘नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. नागरिकांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतिमान होऊ शकतो यासाठी स्वच्छतेबाबत कायम सातत्य असणे गरजेचे आहे.’’ असे मत इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी वडापुरी (ता. इंदापूर) येथे व्यक्त केले.
एक दिवस स्वच्छता श्रमदान व घरकुल लाभार्थ्यांसाठी अभियान या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात परीट बोलत होते. या वेळी सरपंच संगीता तरंगे, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे उपस्थित होते.
परीट म्हणाले, ‘‘या उपक्रमांतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्रोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती, श्रमदानासारखे उपक्रम घ्यावेत. कचरा संकलन व विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, एकल प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभेचे आयोजन करावे. पाणवठ्या जवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करण्यासारखे विविध उपक्रम सरपंचांनी आयोजित करावेत.’’