रेडणी येथे शिवप्रतिमेची मिरवणूक

रेडणी येथे शिवप्रतिमेची मिरवणूक

वडापुरी, ता. १६ : रेडणी (ता. इंदापूर) येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून शिवप्रतिमेची रथातून मिरवणूक करण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर झालेल्या व्याख्यानास शिवप्रेमींचा प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अप्पासाहेब जगदाळे, विलासराव वाघमोडे, कांतिलाल झगडे, महादेव घाडगे, विश्वासराव काळकुटे, सरपंच हिराबाई खाडे, उपसरपंच प्रफुल्ल चव्हाण, अमरदीप काळकुटे, सुरेश खाडे उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयापासून झांज ढोल पथकाच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थ व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवज्योत मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

01746

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com