मकवनाच्या सुक्या चाऱ्याचे दर गगनाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मकवनाच्या सुक्या चाऱ्याचे दर गगनाला
मकवनाच्या सुक्या चाऱ्याचे दर गगनाला

मकवनाच्या सुक्या चाऱ्याचे दर गगनाला

sakal_logo
By

वडापुरी, ता.१४ : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे हिरवा चारा व सुक्या चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. पशुधनासाठी लागणाऱ्या मकवानाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे पशुधन जगण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
मे महिना सुरू झाल्यामुळे विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे मका व चारा पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. सध्या मकवानाचा सुका चारा १२०० ते १४०० रुपये शेकडा तर हिरवा चारा १३०० रुपये ते १८०० रुपये गुंठा असा शेतकरी विकत आहे, यामुळे एकीकडे दुधाचा दर कमी होत आहे तर दुसरीकडे चाऱ्याचे दर गगनाला भिडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या तालुक्यातील शेतकरी मुरघासाकडे वळला आहे, मुरघासामुळे म्हणेल त्यावेळेस जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जरी चाऱ्याचे दर वाढले असले तरी पशुधन जगण्यासाठी शेतकरी वाढलेल्या दराप्रमाणे चारा खरेदी करत असताना दिसत आहे.

शेतीला जोडधंदा असावा म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात दोन-तीन गाई व म्हशी सांभाळत असताना इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.


शेतकऱ्यांनी सांगितलेले दुधाचे दर व चाऱ्याचे दर पुढील प्रमाणे.
गाईचे दुधाचे दर ........... ३५ रुपये
म्हशीचे दुधाचे दर ........... ५० रुपये

हिरवा चारा................१३०० रुपये ते १८०० गुंठा.
सुका चारा................१३०० ते १५०० रुपये (पेंढ्या शेकडा)

01810