आठवडे बाजारांमध्ये सायंकाळीच गर्दी

आठवडे बाजारांमध्ये सायंकाळीच गर्दी

वडापुरी, ता.२७ : इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागातील भरणारे आठवडे बाजार हे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे संध्याकाळी भरत आहेत. आठवडे बाजार दिवसभर ओस पडत आहेत. दिवसभर भाजीपाला विक्रेते व अन्य व्यापारीच बाजारात दिसत असून, ग्राहकांवाचून आठवडे बाजार ओस पडत आहे.

उन्हाच्या झळांमुळे व उकाड्यामुळे लहान मुलांसह वयस्कर, शेतकरी व मजूर हैराण झालेला आहे. इंदापूर तालुक्यात ४२ ते ४४ अंश सेल्सियसपर्यंत तापमान आहे. जसजसे उन्हाची तीव्रता कमी होईल, तसतसे संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास आठवडे
बाजार ग्राहकांनी गजबजलेला दिसत आहे. ग्राहकांनी गजबजलेल्या दिसत आहेत. काही गावामध्ये तर सध्या आठवडे बाजार रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहत आहेत.
वडापुरी येथील आठवडे बाजार गुरुवारी भरला जातो या ठिकाणी वडापुरी सह काटी, रेडा, शेटफळ हवेली, अवसरी, बेडसिंग, सुरवड या ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक या बाजारात येत असतात. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे आठवडे बाजारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळत असून, नागरिक संध्याकाळच्या वेळेस भाज्या घेत असताना दिसत आहेत.

दरम्यान, भाजीपाला, धान्य विक्रेते व व्यापाऱ्यांनी सांगितले की उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसा आठवडे बाजारात अल्प प्रमाणात ग्राहक येत असून संध्याकाळी मात्र खरेदीसाठी गर्दी होत आहे. नागरिक उकाड्यामुळे बाहेर पडत नसल्यामुळे म्हणावी तशी विक्री होत नाही.


01830

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com