इंदापूरकरांच्या गळ्यातील ताईत

इंदापूरकरांच्या गळ्यातील ताईत

इंदापूरकरांच्या गळ्यातील ताईत

विकास कामातून इंदापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलणारे कार्यसम्राट माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रेय (मामा) भरणे हे अल्पावधीतच जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणून गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या आमदार दत्तामामा भरणे यांनी इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करून तालुक्याचा कायापालट केला.

- आदम पठाण, वडापुरी

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रेय (मामा) भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून राजकारणाची सुरवात केली. मागील अडीच वर्षे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. त्या काळात केलेल्या कामामुळे अल्पावधीतच ते जनतेच्या गळ्यातील ताईत झाले.
श्री छत्रपती कारखान्याचे संचालकपद, कारखान्याचे अध्यक्षपद, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेने त्यांना आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिले. यामध्ये त्यांनी अडीच वर्ष राज्यमंत्रिपद भूषविले. या काळात त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली. गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या विकासासाठी ते झटतात. त्यांनी इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करून तालुक्याचा कायापालट केला आहे.
दत्तात्रेय भरणे मामांनी सन २०१४ मध्ये प्रथमच आमदार म्हणून तालुक्याची सूत्रे हातात घेतली.
त्या दिवसापासून सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन तालुक्यात विकास करण्याचा प्रयत्न केला. गोरगरिबांच्या मतदान रुपी आशीर्वादाने जी खुर्ची आपल्याला मिळाली, त्याची जाणीव ठेवून त्यांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी अविरत कष्ट घेताना मामा पाहायला मिळत आहेत.
मामांनी इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यांचा विकास करून रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. या बरोबरच इंदापूर शहराचा विकास केला आहे. तालुक्यातील तीर्थक्षेत्रे व गावांच्या विकासासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. आपल्या कर्तृत्वाने वेगळे विश्व निर्माण केले आहे. इंदापूर तालुक्यातील विश्वासू जनता, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण व महिलांचे हीत डोळ्यासमोर ठेवून त्यांनी योग्य ती पावले उचलली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब, विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विविध योजना राबविण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला. त्यांनी तालुक्यात विकासाचे जाळेच निर्माण केले. त्यामुळे आज तालुक्याचा विकास झाल्याचे दिसत आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील २२ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे. त्यामुळे या भागातील शेतीच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न सुटणार आहे. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. आज इंदापूर तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच रस्ते, पाणी, वीज अशा भरीव कामामुळे आज इंदापूर तालुक्याचे कायापालट झाल्याचे पाहवयास मिळत आहे. कामाच्या माध्यमातून आख्ख्या महाराष्ट्राला इंदापूर तालुक्याचा गर्व वाटेल असे विकासाचे काम करून दाखविलेल्या कार्यसम्राट आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com