वेल्हे बसस्थानक मद्यपींचा अड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्हे बसस्थानक मद्यपींचा अड्डा
वेल्हे बसस्थानक मद्यपींचा अड्डा

वेल्हे बसस्थानक मद्यपींचा अड्डा

sakal_logo
By

वेल्हे, ता. ३० : वेल्हे येथील बसस्थानकाची सध्य मोठी दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या कोणाडोळ्यामुळे ते मद्यपींचा अड्डा बनला आहे. येथे वाहतूक नियंत्रक नाही. येथील स्वच्छतागृहात पाणी नाही तर पिण्याच्या पाण्याची सोय कुठली, विजेची सोय नाही, आजूबाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याने दुर्गंधी पसरली आहे.

वेल्हे येथे शासकीय कार्यालये असल्याने नोकरवर्ग पुण्यावरून या ठिकाणी प्रवास करत असतात. यामुळे प्रवाशांची येथे गर्दी असते. मात्र, कोणतेही प्रवासी हे बसस्थानकात थांबत नसून बाहेर उभे असतात. काही दिवसात वेल्हे तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होतो अशा अशावेळी हक्काच्या जागेच्या ठिकाणी बस स्थानकात प्रवाशांना थांबता येणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बसस्थानकाचा उपयोग मद्यपी, जुगार खेळणारे, मनोरुग्ण करत आहेत. बसस्थानक परिसरात दुर्गंधी येत असल्याने सगळेच प्रवासी हे स्थानकाच्या बाहेर उभे राहत असल्याने हे स्थानक असून नसल्यासारखे आहे.
- प्रकाश गायकवाड, प्रवासी


01181

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00776 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top