संभाजीराजे, बुद्ध जयंती वांगणीत प्रथमच साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे, बुद्ध जयंती वांगणीत प्रथमच साजरी
संभाजीराजे, बुद्ध जयंती वांगणीत प्रथमच साजरी

संभाजीराजे, बुद्ध जयंती वांगणीत प्रथमच साजरी

sakal_logo
By

वेल्हे, ता.१५ : वांगणी (ता. वेल्हे) येथे धर्मवीर संभाजीराजे, भगवान गौतम बुद्ध यांची एकत्रित जयंती साजरी करण्यात आली. तालुक्यात दोन जयंती एकत्र करण्याचा पहिला उपक्रम घेण्यात आला. या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये साठ जणांनी रक्तदान केले. जय भवानी मित्र मंडळ वांगणी यांच्या वतीने शनिवार (ता.१४)रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
वेल्हे तालुक्यात बुद्ध जयंती व संभाजी राजे जयंती एकत्रितपणे साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून या कार्यक्रमाचे अभिनंदन होत आहे.
यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, विजय चोरघे, उपसरपंच शिवाजी चोरघे, वांगणी सोसायटी संचालक तानाजी चोरघे,शिवसेना शाखा प्रमुख संभाजी मुजुमले, आबा फडतरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल निढाळकर,सुयोग ननावरे, अनिकेत चोरघे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00785 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top