तोरणा गडाच्या मातीत प्रेरणादायी ऊर्जा शिवरायांच्या विचारांचा जागर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोरणा गडाच्या मातीत प्रेरणादायी ऊर्जा
शिवरायांच्या विचारांचा जागर करा
तोरणा गडाच्या मातीत प्रेरणादायी ऊर्जा शिवरायांच्या विचारांचा जागर करा

तोरणा गडाच्या मातीत प्रेरणादायी ऊर्जा शिवरायांच्या विचारांचा जागर करा

sakal_logo
By

वेल्हे, ता.१९ : छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. या मातीत प्रेरणादायी ऊर्जा आहे. युवक, युवतींनी शिवरायांचे विचारांचा जागर करावा, असे प्रतिपादन बंडातात्या कराडकर यांनी केले.

वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या तोरणा विद्यालयाच्या प्रांगणात युवक व युवतींसाठी प्रतापी संस्कार शिबिराचे शनिवार (ता.१४) ते मंगळवारपर्यंत (ता.१७) व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने आयोजन केले होते. शिबिरात महाराष्ट्रातून ७०० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते.

शिबिरात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने तोरणागड सर करणे, पारायण, चर्चासत्र, व्याख्यान, कीर्तन, प्रबोधन, विविध स्पर्धा, जवानांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोहळ्यात १४ मे रोजी संभाजी महाराज जयंतीदिनी धर्मवीरसंभाजी महाराज पुरस्कार भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर अभिजित सोनवणे(पुणे) यांना अभय भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कलियुगातील गांधारी नीता भावेश भाटीया(महाबळेश्वर) महिलांना त्यांच्या अतिविशेष सामाजिक कार्याच्या योगदानासाठी दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार राधा कृष्णाजी रांजणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर राष्ट्रबंधू राजीव दीक्षित पुरस्काराने सामांन्यांचे डॉ. पोपटराव गावडे, जलसंधारणातील कामाबद्दल पुरस्कार देण्यात आला.तर ग्रामपंचायत कोपर्डे (ता. खंडाळा) येथील सरपंच दीपक शिंदे यांना विशेष पुरस्काराने बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.


यावेळी व्यासपिठावर संघटनेचे अध्यक्ष दीपक जाधव, महिला संघटनेच्या अध्यक्षा मंगल देशमुख, राष्ट्रबंधु राजीव दीक्षित, गुरूकुल पिंपरदचे अध्यक्ष प्रा.गवळी आदी उपस्थित होते. संघटनेचे मार्गदर्शक विलासबाबाजवळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा.संजय अहिरेकर यांनी सूत्रसंचलन तर संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ मालुसरे यांनी आभार मानले.


01208

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00787 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top