खरीप पूर्व हंगामाचे करंजावणेत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पूर्व हंगामाचे करंजावणेत प्रशिक्षण
खरीप पूर्व हंगामाचे करंजावणेत प्रशिक्षण

खरीप पूर्व हंगामाचे करंजावणेत प्रशिक्षण

sakal_logo
By

वेल्हे, ता.४ : करंजावणे व अडवली (ता. वेल्हे) येथे कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व केव्हीके बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षण येथे आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक संतोष करंजे, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, मंडळ अधिकारी सोमनाथ आहेरकर, पर्यवेक्षक टी. जी. गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागीरे, कृषी सहायक महेश जगताप, सचिन निगडे, तुषार तडवी, मनोज जाधव, सोमनाथ तांबे, उमेश शिंदे, रमेश बेलेकर व शेतकरी उपस्थित होते.
कोंढाळकर यांनी प्रास्ताविकात सोयाबीन व भात प्रकल्पाविषयी माहिती दिली. संतोष करंजे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी सोयाबीन लागवड व चारसूत्री भात लागवड इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी करंजावणेचे सुभाष शिंदे,संदीप शिंदे, अनंता शिंदे, अर्जुन शिंदे, भरत शिंदे, बाबू शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन महेश जगताप, सचिन निगडे यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00800 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top