वेल्ह्यात शिक्षकांनीच ठेवल्या शाळा बंद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्ह्यात शिक्षकांनीच ठेवल्या शाळा बंद 
प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी
प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी
वेल्ह्यात शिक्षकांनीच ठेवल्या शाळा बंद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी

वेल्ह्यात शिक्षकांनीच ठेवल्या शाळा बंद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची मुजोरी

sakal_logo
By

वेल्हे, ता.१८ : पावसाच्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळा मुलांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. शिक्षकांना मात्र कार्यालयीन कामकाजासाठी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक होते, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र या आदेशाला वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५० टक्क्यांहून अधिक कामचुकार शिक्षकांनी केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे.

शाळेत उपस्थित असणे आवश्यक असताना शिक्षकांनीच चक्क शाळा बंद ठेवल्याचे असल्याचे समोर आले आहे. ''सकाळ''ने केलेल्या पाहणीत हे धक्कादायक चित्र समोर आले त्यामुळे इमानदारीने काम करत असलेल्या इतर शिक्षकांवर कामचुकार शिक्षकांमुळे शिंतोडे उडवले जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक वर्षाची सुरुवात होतानाच वेल्हे तालुक्यातील अठरा गाव मावळ परिसरातील जिल्हा परिषद शाळांचा बाबतीत तक्रारी समोर येत असतानाच लगेच दुसऱ्या महिन्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही कामचुकार शिक्षकांकडून शाळेला दांडी मारण्याचे, शाळेत उशिरा येण्याचे, लवकर जाण्याचे सत्र चालू ठेवले आहे. शुक्रवारी (ता.१५) चेलाडी वेल्हा रस्त्यावरिल मार्गसनी, खांबवडी, हिरपोडी, कोंढावळे खुर्द तर शनिवारी (ता. १६) आसनी मंजाई, दामगुडा आसनी, सूरवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या तर किल्ले राजगड व किल्ले तोरणाच्या पायथ्याशी असलेल्या व पानशेत परिसरातील अनेक प्राथमिक शाळा बंद असल्याचे सुज्ञ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

व्यवस्थापन समितीच्या अंकुशाचा अभाव
वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा शिवाय कोणतीही प्राथमिक शिक्षणाची सोय नाही. तालुक्यामधील बहुतांशी नागरिक यांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने मुलांच्या शिक्षणाची भिस्त ही जिल्हा परिषदेच्या शाळेंवरच अवलंबून आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत प्रशासनाचे तसेच गावातील शालेय व्यवस्थापन समितीचा अंकुश नसल्याने अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवणे शिक्षकांनी संगणमताने शाळेवर दांड्या मारणे, उशिरा शाळेत येऊन लवकर शाळेतून जाण्याचे प्रकार वारंवार समोर येत असल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक धोक्यात येत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने शाळांमध्ये बायोमेट्रिक थम मशिन बसवणे काळाची गरज आहे.

ज्या शिक्षकांनी गैरहजर राहून शाळा बंद ठेवल्या त्या शिक्षकांचे विनावेतन करण्यात येईल, तसेच अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
-पंकज शेळके, गट विकास अधिकारी, वेल्हा

शिक्षकांना वेळोवेळी सूचना देऊन असे प्रकार घडत असतील तर माहिती देऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
-कमलाकांत म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी


वेल्हे तालुक्यातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हेच मुख्यालयात राहत नाही तर 90% हून अधिक नोकरदार हे व अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने प्रशासकीय कामांवर दुर्लक्ष होत आहे
-दिलीप फडके, ग्राहक पंचायत जिल्हा, प्रसिद्धीप्रमुख

आपत्ती व्यवस्थापन सारख्या अती महत्त्वाच्या कामांमध्ये शिक्षकांनी कार्यालयीन वेळेमध्ये शाळेमध्ये उपस्थित राहणे गरजेचे असून कामचुकारपणा शिक्षक संघटनांना अपेक्षित नाही .
- वसंत हारपुडे, अध्यक्ष, वेल्हे तालुका शिक्षक संघ

01315

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00840 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top