सोंडे रस्त्यावर झाड पडल्याने गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोंडे रस्त्यावर झाड पडल्याने गैरसोय
सोंडे रस्त्यावर झाड पडल्याने गैरसोय

सोंडे रस्त्यावर झाड पडल्याने गैरसोय

sakal_logo
By

वेल्हे, ता.१८ : आंबवणे गावच्या तळेकर वाडीपासून सोंडे परिसराला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठी निलगिरीचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस ठप्प झाली आहे. यामुळे परिसरातील नोकरदार व विद्यार्थ्यांचे मोठे गैरेसाय होत आहेत. त्यामुळे हे झाड हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वेल्हे तालुक्यामध्ये जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अंबवणे येथील तळेकर वाडीवरून सोंडे सरपाले, सोंडे कार्ला, सोंडे हिरोजी, माथना सोंडे, सुरवड, वडगाव, कोदवडी या गावांना जोडणारा रस्ता चार दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता. दरम्यान, या रस्त्यावर झाड पडल्याचे जड वाहनांसह दुचाकी तसेच चारचाकी वाहनचाक तसेच नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सोंडे परिसरातून नसरापूर, पुणे, खेड शिवापूर या ठिकाणी सगळ्यात जवळचा मार्ग हा असून रोज कामावर जाणारे चाकरमानी दुग्ध व्यावसायिक विद्यार्थी या रस्त्याने जात असतात. परंतु या रस्त्यावर मोठे झाड पडल्याने आठ ते दहा किलोमीटर अंतराचा वळसा घालून नागरिकांना जावे लागत आहे. यासाठी नागरिकांचा व व्यावसायिकांचा वेळ वाया जात असून प्रवासासाठी अधिकचा खर्च येत आहे. यासाठी तात्काळ झाड बाजूला करून रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी माजी सरपंच अशोक खोपडे, महेश जाधव, शरद कार्ले, विष्णू जाधव, दत्ता पवार, अर्जुन कार्ले या स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय संकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ या ठिकाणचे झाड हलवले जाऊन रस्ता वाहतुकीस खुला करणार असल्याचे सांगितले

झाड पडल्याने वाहने येथे अडकून पडत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच सोंडे रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी.
-विलास तळेकर, माजी सरपंच, आंबवणे

01320

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00842 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top