पानशेत खोऱ्यात १४ जनावरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानशेत खोऱ्यात १४ जनावरांचा मृत्यू
पानशेत खोऱ्यात १४ जनावरांचा मृत्यू

पानशेत खोऱ्यात १४ जनावरांचा मृत्यू

sakal_logo
By

वेल्हे, ता. १७ ः पानशेत धरण खोऱ्यातील अति दुर्गम खाणू परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डिगे वस्ती येथे गाई, बैल, म्हैस अशा १४ जनावरांचा मृत्यू झाला. परिसरातील सर्व गावांतील माहिती उपलब्ध झाल्यानंतर मृत जनावरांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वेल्हे तालुका पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ यांच्यासह पथकाने रविवारी (ता. १७) घटनास्थळी भेट दिली.

यासंदर्भाने वेल्हे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दुर्गम वाड्या, खेड्यात जाऊन माहिती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तर
शवविच्छेदनानंतर जनावरांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय कनुजे यांनी सांगितले.
दोन आठवड्यापासून वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टी सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे ओढे नाल्यांना पुर आले होते. रात्रंदिवस धो धो पाऊस कोसळत होता. यापरिस्थितीत रानात सोडलेली जनावरे रात्री उशिरापर्यंत घरी आली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी रानात गेले.त्यावेळी बबन झिमा कोकरे यांच्या चार गायी व दोन बैल, धोंडिबा झिमा कोकरे यांचा एक बैल, धोंडिबा रामा कोकरे यांची एक गाय, बबन रामचंद्र कोकरे यांची एक गाय, एक बैल, नथू धोंडू कोकरे यांची एक गाय, म्हाळू काळू कोकरे यांच्या दोन गायी, एक म्हैस अशा १४ जनावरांचा मृत्यू झाला असल्याचे समजले.याबाबत टेकपोळेचे सरपंच संतोष कोकरे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर प्रशासनाचे डिगे वस्तीत धाव घेतली.
पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील अति दुर्गम डोंगरकड्यावर खाणू, चांदर, डिगेवस्ती या वाड्या वस्त्या आहेत. थंड वादळी वाऱ्यासह धोधो पाऊस पडत असल्याने जनावरांचा मृत्यू झाला, असावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00843 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top