लाशिरगाव येथील रेशनचे १२४ पोती धान्य चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाशिरगाव येथील रेशनचे
१२४ पोती धान्य चोरीला
लाशिरगाव येथील रेशनचे १२४ पोती धान्य चोरीला

लाशिरगाव येथील रेशनचे १२४ पोती धान्य चोरीला

sakal_logo
By

वेल्हे, ता. २० : लाशिरगाव (ता. वेल्हे) येथील रेशनिंग दुकान रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी फोडले असून, गहू व तांदळाची अंदाजे १२४ पोती चोरीला गेल्याची माहिती येथील रेशनिंग दुकानदार बळिराम आधवडे यांनी दिली. वेल्हे पोलिस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
याबाबत दुकानदार आधवडे यांनी माहिती दिली की, मालवली व लाशिरगाव या दोन गावांचे रेशनिंग माझ्या दुकानात वाटपासाठी असते. मशिन बंद असल्याने या महिन्याचे वाटप झाले नाही. माझे रेशनिंग दुकान मालवली येथील कातुर्डेवाडी येथे आहे. या दुकानातून १९४ कुटुंबांना धान्य वाटप केले जात आहे. येथील दुकान वस्तीमध्ये असून, रात्रीच्या अंधारात दुकानाच्या मागच्या बाजूने चोरट्यांनी भिंतीच्या विटा काढून गहू व तांदूळ, अशी १२४ पोती चोरीला गेली आहेत. दुकानामध्ये इतर वस्तु देखील होत्या, परंतु खिडकीद्वारे जास्त वस्तु चोरट्यांना चोरता आल्या नाहीत.
दरम्यान, मागील आठवड्यात येथील समाज मंदिरातून तांब्याची ४ मोठी भांडी चोरीला गेल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.