आंबेगाव बुद्रुक परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव बुद्रुक परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून
आंबेगाव बुद्रुक परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून

आंबेगाव बुद्रुक परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून

sakal_logo
By

वेल्हे, ता. १३ : आंबेगाव बुद्रूक (ता. वेल्हे) येथील पानशेत धरण भागात अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी ही माहिती दिली.
हा प्रकार मंगळवारी (ता. १२) दुपारी उघडकीस आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे आहे. उंची १७२ ते १७५ सेमी आहे. त्याच्या अंगात निळसर रंगाचा फूल बाह्यांचा टी शर्ट आहे. राखाडी रंगाची फूलपॅंट आहे. एका हातावर चित्र व इंग्रजी आर अक्षराचा टॅटू आहे. या बाबत कोणाला माहिती असल्यास वेल्हे पोलिस ठाण्याशी (०२१३०, २२१२३३ अथवा ७३५०८३६१००) संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.