नाळवट येथे विहिरीचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाळवट येथे विहिरीचे लोकार्पण
नाळवट येथे विहिरीचे लोकार्पण

नाळवट येथे विहिरीचे लोकार्पण

sakal_logo
By

वेल्हे, ता.२२ : नाळवट (ता. वेल्हे) येथे विहिरीचे लोकार्पण नुकताच पार पडला. ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंतराव लिमये यांच्या हस्ते सार्वजनिक विहिरीचे उद्‌घाटन करण्यात आले.
विहिरी बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या केपीआयटी टेक्नॉलॉजीचे भारतातील मनुष्यबळ विभागप्रमुख शाश्वत मित्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विहिरीसाठी स्वतः:च्या जागेचे बक्षीसपत्र करून देणारे बापू खुळे तसेच विहिरी उत्तम प्रकारे बांधकाम करणारे गावातील गवंडी शिवाजी मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी केपीआयटीचे सीएसआर अधिकारी तुषार जुवेकर तसेच ज्ञान प्रबोधिनीचे विवेक गिरिधारी, सुनीता गायकवाड, नितीन सावंत, बापू जोरकर आणि कोलंबीचे सरपंच शीतल कोडीतकर, उपसरपंच सागर शिळीमकर, आशिष क्षीरसागर आदी उपस्थित होते. सुनील जोरकर यांनी सूत्रसंचालन तर रामचंद्र मोरे यांनी आभार केले.

गावात पूर्वी पाण्याची खूप अडचण होती. उन्हाळ्यात शेवटचे दोन महिने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असे. डोंगरातून फिरून पाणी आणावे लागत असे. आता विहिरीमुळे आम्हाला गावाजवळच पाण्याची सोय झाल्याने खूप आनंद झाला आहे.
- गीताबाई नवासकर


01665