कोंढावळे येथे आगीत घर खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढावळे येथे आगीत घर खाक
कोंढावळे येथे आगीत घर खाक

कोंढावळे येथे आगीत घर खाक

sakal_logo
By

वेल्हे, ता. १५ : वेल्हे तालुक्यातील कोंढावळे बुद्रुक येथे लागलेल्या आगीत शेतकरी रावजी भुरूक यांचे घर जळाले असून, लाखोचे नुकसान झाले आहे. रावजी भुरूक व त्यांची पत्नी शेतात गेल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. ही दुर्घटना मंगळवारी (ता. १४) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शॉकसर्कीटमुळे घराला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
आगीने रौद्र रूप, आगीचे लोटात आपल घर जळून खाक होताना पाहून भुरूक पती-पत्नी यांना अश्रू अनावर झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, उभ्या आयुष्याची कमाई तसेच काही रक्कम, घरातील सर्व सामान, जनावरांचे खाद्य यांचे पूर्ण नुकसान होऊन काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांच्या कुटुंबाचे हक्काचे छप्पर हिरावून घेतलाय.
आग आटोक्यात आणण्यासाठी पुष्कर वैद्य, तानाजी खोपडे, सचिन खोपडे, तानाजी भुरूक, विजय भुरूक, रमेश भुरूक, विजय थोपटे, कुमार भुरूक, राहुल रेणुसे, गणपत देवगिरीकर यांनी प्रयत्न केले.
झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याची तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. आनंद देशमाने, शुभम बेलदरे, प्रवीण खोपडे, नानासाहेब साबणे, विठ्ठल गोरे यांनी भेट देऊन मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.