पिकअप उलटून चालक जखमी

पिकअप उलटून चालक जखमी

वेल्हे, ता. १३ : वेल्हे तालुक्यातील कादवे-विहीर घाट रस्त्यावर दुधाची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. लक्ष्मण निवृत्ती राजीवडे (वय ४१) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. त्याच्यावर वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज शनिवारी ( ता.१३) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

पानशेत भागातील कादवे, वरघड येथे दूध संकलन करून वेल्हे-पानशेत रस्त्याच्या कादवे-विहीर घाटाने वेल्हे कडे चालले होते. विहीर गावच्या हद्दीत तीव्र उतारावरील अरुंद रस्त्यावर अचानक टेम्पो रस्ता सोडून बाजूला गेला. त्यावेळी प्रसंगधानता दाखवत चालक राजीवडे यांनी टेम्पो गटाराच्या बाजूला नेला. गटारात जाऊन टेम्पो पलटी झाला. अपघातात दुधासह टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
टेम्पोत त्यांच्या सह तिघे जण होते.इतरांना किरकोळ मार लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com