पोलिस दलाच्या सुविधांसाठी १०० कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस दलाच्या सुविधांसाठी १०० कोटींचा निधी
पोलिस दलाच्या सुविधांसाठी १०० कोटींचा निधी

पोलिस दलाच्या सुविधांसाठी १०० कोटींचा निधी

sakal_logo
By

वेल्हे, ता.१ : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

वेल्हे पोलिस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीचे उद्‌घाटन बुधवारी (ता.३१) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, की राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलिस दलाला सुसज्ज साधने तसेच पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता निधी देण्यात आला आहे. यावेळी पुणे जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वेल्हे पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी दोन कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे यावेळी आवर्जून पाटील यांनी सांगितले.


विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, वेल्हे पोलिस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलिस दल कार्यरत असून पोलिस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, की जुने पोलिस ठाणे ब्रिटिशकालीन इमारतीत होते. सदर इमारत मोडकळीस आल्याने येथील कामकाज २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन सुरू होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस स्थानकाच्या नवीन इमारत बांधकाम आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे

दरम्यान, पाटील यांच्या हस्ते पोलिस स्थानक प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर , वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते.


यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे वेल्हे भाजप अध्यक्ष सुनील जागडे, राजेंद्र शिळीमकर, आनंद देशमाने, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, अमोल नलावडे,
तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


पोलिस ठाण्याचे एकूण चटई क्षेत्रफळ : ७८३.३० चौरस मीटर
तळ मजल्यावरील एकूण कक्ष : १२

01800