विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्क्याने  शेतकऱ्याचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By

वेल्हे, ता.४ : कोळवडी (ता. वेल्हे) येथील शेतकऱ्यास विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना आज (ता.४) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
बाळू हरी कन्हेरकर (वय ५५, रा. कोळवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत भाऊ पांडुरंग हरी कन्हेरकर यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मृत शेतकरी घराच्या बाजूला असलेल्या घरामध्ये जात असताना विद्युत तारेचा स्पर्श शेतकऱ्यांच्या गास झाला. विद्युत तार अंगावर चिकटल्याने त्यांच्या छातीवर व पोटावर विजेचा धक्का बसून, तार अंगास चिटकून राहिली. दरम्यान, शेतकऱ्याने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला होता. यामुळे शेजारील नागरिक गोळा झाले. यावेळी बाळू कनेरकर हे निपचित जमिनीवर पडले होते.
दरम्यान, कन्हेरकर यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी तपासणी केली असता शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत प्राथमिक तपास पीएसआय महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुरेश मोरे पोलिस हवालदार प्रदीप कुदळे यांनी केला असून अधिक तपास पोलिस हवलदार ज्ञानदीप धिवार करीत आहेत.


01818