वालचंदनगर शटल बंदमुळे गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वालचंदनगर शटल बंदमुळे गैरसोय
वालचंदनगर शटल बंदमुळे गैरसोय

वालचंदनगर शटल बंदमुळे गैरसोय

sakal_logo
By

वालचंदनगर ता. ३० : येथील वालचंदनगर (ता. इंदापूर) हे महत्त्वाचे शहर आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इंदापूर-वालचंदनगर शटल सेवा बंद झाली होती. सध्या ही शटल बंद असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच पुणे- सोलापूर, बारामती-इंदापूर व बारामती - कळंब- बावडा-नरसिंहपूर (बी.के.बी.एन) हे तीन महत्त्वाचे मार्ग आहेत.
बीकेबीएन रस्त्याने बंद झालेली लालपरी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झालीच नाही. सध्या बारामती ते जांब, कुरवली, उद्घट मार्ग एकच शटल सुरू आहे. यामुळे नीरा नदीकाठच्या परीसरातील येणारे नागरिक, प्रवाशी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना बारामती, इंदापूर, नातेपुते व अकलुजमध्ये जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या बीकेबीएन रस्त्याचे काम सुरु असून अनेक गावामध्ये कामही पूर्ण झाले आहे. अनेक वेळा मागणी करून बस सेवा सुरू होत नसल्यामुळे नीरानदीकाठचे नागरिक आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत.

दरम्यान, इंदापूर आगाराचे प्रमुख मेहबूब मणेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इंदापूर-वालचंदनगर शटल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून लवकरच सेवा सुरू करण्यात येईल.


इंदापूर आगरातून वालचंदनगर-इंदापूर शटल सेवा सुरू होती. दिवसामध्ये या शटलच्या सहा फेऱ्या होत होत्या. मात्र, सध्या एक ही फेरी होत नसल्यामुळे नागरिकांनी इंदापूरला ये-जा करायची कशी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एस.टी.ची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांनी वाढीव पैसे मोजून प्रवास करावा लागत असून तातडीने शटल सेवा सुरू करावी.
- अतुल तेरखेडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
---
बसस्थानक बनले अस्वच्छतेचे आगार
वालचंदनगरच्या बाहेरील बाजू एस.टी. बसस्थान आहे. येथे प्रवाशांची वर्दळ पहिल्यापासून कमी आहे. मात्र येथे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. तसेच वालचंदनगरमधील जुन्या बसस्थानजवळील पत्र्याचे शेड व कट्टा काढून टाकल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रवाशांसाठी निवारा करण्याची गरज आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05193 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top