वालचंदनगर बॅंकेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वालचंदनगर बॅंकेच्या 
अध्यक्षांवर गुन्हा दाखल
वालचंदनगर बॅंकेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

वालचंदनगर बॅंकेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १३ : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सतीश मच्छिंद्र कसबे यांना अपमानित करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी बॅंकेचे अध्यक्ष व प्रभारी व्यवस्थापकावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष दत्तात्रेय मारुती रासकर (सध्या रा. सातारा) व प्रभारी व्यवस्थापक जयंत दादासाहेब डोंबे (रा. वालचंदनगर) यांच्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी २५ डिसेंबर २०२१ ते ३ मे २०२२ या काळामध्ये कसबे हे बॅंकेचे उपाध्यक्ष असताना बॅंकेच्या व्यवहाराची माहिती दिली नाही. कार्यक्रमालाही बोलावले नाही. तसेच, वारंवार जातिवाचक बोलून अपमान केला. तसेच, जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, अशी फिर्याद कसबे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात दिली. याबाबतचा तपास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती गणेश इंगळे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05215 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top