बेलवाडीत १०० विद्यार्थी गिरवतायेत संस्काराचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलवाडीत १०० विद्यार्थी गिरवतायेत संस्काराचे धडे
बेलवाडीत १०० विद्यार्थी गिरवतायेत संस्काराचे धडे

बेलवाडीत १०० विद्यार्थी गिरवतायेत संस्काराचे धडे

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १९ : बेलवाडीमधील (ता.इंदापूर) जामदारवस्ती येथील जोतिबाचा मळा येथे बालसंस्कार शिबिरामध्ये १०० विद्यार्थी संस्काराचे धडे गिरवत आहेत.
बेलवाडीमधील जामदारवस्ती जवळील जोतिबाचा मळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये ९ ते १५ वर्ष वयोगटातील मुले-मुलींसाठी सुमारे तीन वर्षानंतर निवासी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिबिराचे हे पाचवे वर्ष असून, या माध्यमातून अनेक मुले घडली आहेत. तसेच संस्कारक्षम पिढी तयार होण्यास मदत झाली आहे. हे शिबिर ३ मे रोजीपासून निवासी बालसंस्कार शिबिर सुरू असून यामध्ये १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संस्काराचे धडे गिरवत आहेत.

शिबिरामध्ये नाशिकचे शिवलिंग महाराज स्वामी, तसेच तुकाराम मुळीक महाराज, केशव मुळीक महाराज, श्रीनिवास वाघमोडे महाराज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच आळंदीमधील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे-हासेगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरासाठी नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांनी मोलाची मदत करतात. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, अंकुश जामदार, अर्जुन जामदार, प्रताप जामदार, ज्योतिराम जामदार, शशिकांत जामदार परिश्रम घेत आहे.

शिबिरात हे शिकविण्याला प्राधान्य
१. सकाळी योग-प्राणायाम, प्रार्थना
२. श्‍लोकाचे पठन, पांडुरंग अष्टक पठन, ज्ञानेश्‍वरी पठन,
३. भगवतगितेचा १५ व्या अध्याय व हनुमान चालिसेचे पठन
४. मृंदग, गायन, तबला, हार्मोनियम, पेटी वाजविण्याची शिकवणी
५. जीवन कसे जगावे याबाबतचे मार्गदर्शन
---

02180

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05223 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top