अंथुर्णे येथे दुकानातून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंथुर्णे येथे दुकानातून चोरी
अंथुर्णे येथे दुकानातून चोरी

अंथुर्णे येथे दुकानातून चोरी

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २३ : अंथुर्णे-दळवीवस्ती (ता. इंदापूर) येथे चोरट्यांनी शेतीउपयोगी साहित्याच्या दुकानाचा पत्रा कापून अडीच लाख रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली.
दळवीवस्ती येथे सचिन दळवी यांचे ‘गोविंद ट्रेडिंग कंपनी’ या नावाने शेतीउपयोगी वस्तूचे दुकान आहे. सध्या पत्र्याच्या शेडमध्ये दुकान सुरु आहे. रविवारी (ता. २२) रात्रीच्या वेळी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून दुकानातील विद्युत पंप, केबल, पाइप सह शेतीउपयोगी साहित्य व रोख १० हजार रुपये, असा अडीच लाखांचा ऐवज लंपास चोरुन नेला. दुकानामध्ये सीसीटिव्ही बसवले होते. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरचे मशिनही चोरुन नेले. चोरीच्या ठिकाणी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे यांनी भेट दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05235 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..