दारू विक्रेत्याकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू विक्रेत्याकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
दारू विक्रेत्याकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

दारू विक्रेत्याकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २९ ः बोरी (ता. इंदापूर) येथे अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमोल मधुकर कुचेकर (रा. बोरी) या दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ आनंदराव गोलांडे (वय ३६) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी गावामध्ये अमोल कुचेकर हा अवैध देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक फौजदार बाळासाहेब पानसरे व पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ गोलांडे हे शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी अमोल कुचेकर रस्त्यावर कापडी पिशवीमधून अवैध दारू विकत होता. पोलिसांनी कारवाई करून अवैध दारुसाठा व कुचेकर याला ताब्यात घेत असताना पोलिस कॉन्स्टेबल गोलांडे यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी कुचेकर याला अटक करून त्याच्याकडून ४५० रुपयांच्या देशी दारुसह एक दुचाकी असा ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05246 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top