लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे शिल्पकार ः राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे शिल्पकार ः राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे
लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे शिल्पकार ः राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे

लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे शिल्पकार ः राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे

sakal_logo
By

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे वाढदिवस लेख - २

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली लाकडी-निंबोडी जलसिंचन योजना मार्गी लागली असून योजनेसाठी ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. योजना मार्गी लावण्याचे श्रेय राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे असून इंदापूरच्या जनतेला भरणेमामांच्या कामांचा विसर कधीच पडणार नाही.

धरण उशाला अन् कोरड घशाला...
धरण उशाला अन् कोरड घशाला अशी मराठीमध्ये म्हण आहे. अशीच काहीशी अवस्था इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी परीसरातील शेतकऱ्यांची झाली होती. राज्यातील मोठ्या धरणामध्ये समावेश असलेले उजनी धरण तालुक्यात असूनही लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे काम २५ वर्षांपासून रखडल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंत्रिपदाच्या शपथेबरोबर लाकडी-निंबोडी सिंचन योजना मार्गी लावण्याची शपथच घेतली होती. उजनी जलाशयातून लाकडी-निंबोडी सिंचन योजनेसाठी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निधीमुळे योजनेचे काम रखडले होते. लाकडी-निंबोडी सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अनेक आश्‍वासने देण्यात आली होती. प्रत्येक निवडणुकीमध्ये योजना पूर्ण करण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना मिळत होते. मात्र, पाच वर्ष कधी गेली हे शेतकऱ्यांना समजतच नव्हते. पुन्हा तेच आश्‍वासन मिळत होते. त्याच तिकिटावर तोच खेळ सुरु असायचा.

अन् योजनेचा मार्ग झाला मोकळा
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत आहेत. भरणे मामांनी मंत्रिपदाच्या शपथेसोबत तालुक्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्याची शपथ घेतली. मंत्री झाल्यानंतर लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाकडी-निंबोडी जलसिंचन योजनेला मंजुरी देवून निधीची तरतूद केली. गेल्या १५ दिवसांपूर्वी योजनेसाठी ३४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. यामुळे इंदापूर व बारामती तालुक्यातील १७ गावातील ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होणार आहे. माळरानावरतीही शेती फुलणार असून आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

इंदापुरातील १० गावांना फायदा...
लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचा इंदापूर तालुक्यातील १० गावांना फायदा होणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे व खडकवासला कालव्याचे पाणी शेतीसाठी मिळत नव्हते. यामुळे या भागातील जमीन जिरायती राहिली होती. लाकडी-निंबोडी सिंचन योजनेमुळे १० गावातील १०८४५ एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून तालुक्यातील लाकडी, निंबोडी, काझड, शिंदेवाडी, लामजेवाडी, शेटफळगढे, म्हसोबाची वाडी, निरगुडे, वायसेवाडी, अकोले (धायगुडेवाडी) या गावातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05251 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top