
पाणीवाले मामा... राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे...
इंदापूर तालुक्याच्या विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामांकडे पाहिले जाते. मामांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावातील तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्याची केलेली भीष्म प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे चालली असून यातील लाकडी-निंबोडी सिंचन योजनेच्या पाणी प्रश्नाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच २२ गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार असून तालुक्याच्या इतिहासामध्ये भरणे मामांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल...
वीरसिंह रणसिंग, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पुणे जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणजेच इंदापूर तालुका. तालुक्याच्या पूर्वेला भीमा नदी व दक्षिणेला नीरा नदीचा भव्य किनारा आहे. तालुक्यामध्ये नीरा डावा व खडकवासल्याच्या कालव्याचे जाळे आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी असलेले उजनी धरण असून उजनी धरणाच्या पाण्याचा फुगवटा हजारो फूट आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये उजनीचे पाणी आहे. तसेच पुणे-सोलापूर महामार्ग व संत तुकाराम महामार्ग तालुक्यातून जात आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीशिवाय शेतकऱ्यांची प्रगती शक्य नाही. शेतकऱ्यांना काय हवं असतं.... शेतीसाठी पाणी... अनं राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा शेतीसाठी मुबलक पाणी देत आहेत.
नीरा डावा कालवा उन्हाळ्यातही तुडुंब -
मागील राज्य सरकारने नीरा डावा कालव्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूरचे पळवलेले पाणी पुन्हा इंदापूरकडे वळविले. आज उन्हाळ्यामध्ये नीरा डावा कालवा तुडूंब वाहत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही मुबलक पाणी मिळत आहे. मामा मंत्री नसते तर तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात एक थेंबही पाणी मिळाले नसते. तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळून गेली असती.
लाकडी-निंबोडीचा पाणी प्रश्न सोडविला...
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामांनी इंदापूर तालुक्यातील गेल्या २५ वर्षापासून रखडलेला लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला असून यासाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
२२ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न...
इंदापूर तालुक्यातील २२ गावातील पाण्याच्या प्रश्न सुटेल या प्रतिक्षेमध्ये तिसरी पिढी आहे. माझे वडील स्वर्गीय विश्वासराव रणसिंग, सूर्यकांत रणवरे यांनाही पुढाकार घेऊन अनेक आंदोलने केली. मात्र याला यश आले नव्हते. मामांनी राज्यमंत्री पदाबरोबरच २२ गावातील पाणी प्रश्न सोडविण्याची शपथ घेतली आहे. यासाठी प्रयत्न सुरु असून इंदापूर तालुक्यातील शेतकरी मामांचे उपकार कधीच विसरणार नाहीत. त्यांचे नाव आगामी काळात सुवर्णाक्षरांमध्ये लिहिले जाईल.
इंदापूरसाठी ५ टीएमसी...
पुण्यातून उजनी धरणामध्ये वाहून येणाऱ्या ५ टीएमसी सांडपाण्याची इंदापूर तालुक्यासाठी तरतूद करून २२ गावासह तालुक्यातील इतर गावांचाही पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा मामांनी प्रयत्न केला होता. मात्र तालुक्यातील विरोधकांनी ही पाणी योजना हाणून पाडली. मात्र मामांनी पाणीप्रश्न सोडविण्याची भीष्म प्रतिज्ञा केली असून २२ गावांचा पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणारच नाहीत.
नीरा नदीकाठच्या गावांचा विकास...
दत्तात्रेय भरणे मामांनी नीरा नदीकाठच्या गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना तयार केल्या आहेत. तालुक्यातील नीरा नदीवर बोराटवाडी व खोरोची येथे पुलाचे काम सुरु आहे. यामुळे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यास सोईस्कर होणार आहेत. याचा परिणाम तालुक्याच्या विकासावर होणार आहे.
घर तिथे नळ योजनेसाठी ४०० कोटी...
तालुक्यातील प्रत्येक गावामधील प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ असावा तसेच महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरावा यासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा प्रयत्नशील आहेत. यासाठी हर घर जल योजनेसाठी तालुक्यामध्ये नळपाणी पुरवठा योजनेची कामे सुरु असून आत्तापर्यंत ४०० कोटी रुपयांचा निधी पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध झाला आहे.
रस्त्यांची कामे मार्गी...
इंदापूर तालुक्यातील अनेक गावे अशी होती की, त्या गावांना जाण्यासाठी रस्ते ही नव्हते. रस्ते नसल्यामुळे त्या गावातील नागरिकांशी सोयरीक करण्याचे टाळले जात होते. मुलांना विवाहासाठी मुली ही देत नव्हते. अशी तालुक्याचा अवस्था झाली होती. मामांनी तालुक्यातील प्रत्येक रस्ता करण्याची शपथ घेतली असून तालुक्यातील रस्त्यांची कामे वेगाने सुरु आहेत. आगामी काळामध्ये तालुक्यातील एक इंच देखील रस्ते काम राहणार नाही अशा जनतेला विश्वास आहे.
जलसंधारणाची कामे वेगाने...
इंदापूर तालुक्यामध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून ओढ्यामार्गे नदीला जात असते. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरावे यासाठी मामांनी तालुक्यात ओढे, नाल्यावरती बंधारे बांधण्यास सुरुवात केली असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05253 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..