ऊसलागवड : पाच फुटी पट्टा पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन छत्रपती कारखान्याचे धोरण जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसलागवड : पाच फुटी पट्टा पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन
छत्रपती कारखान्याचे धोरण जाहीर
ऊसलागवड : पाच फुटी पट्टा पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन छत्रपती कारखान्याचे धोरण जाहीर

ऊसलागवड : पाच फुटी पट्टा पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन छत्रपती कारखान्याचे धोरण जाहीर

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ६ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ गळीत हंगामाचे ऊसलागवड धोरण जाहीर केले असून, सभासदांनी जास्त रिकव्हरीच्या उसाच्या जातीची ५ फुटी पट्टा पद्धतीने लागवड करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.

श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली असून, कारखान्याने ऊसलागवड धोरण निश्चित केले आहे. गतवर्षी १५ जून ते ३० एप्रिलपर्यंत ऊसलागवड करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, गतवर्षीच्या धोरणामध्ये कारखान्याने बदल केला असून, १ जुलै २०२२ पासून ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ऊसलागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत कोएम-२६५ या ऊस जातीची लागवड करावी. तर १५ जुलै २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत को- ८६०३२ या जातीची, १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कोसी- ८६०३२, कोव्हीएसआय- ८००५ व एमएस -१०००१ या उसजातींची लागवड करावी, असे सांगण्यात आले आहे.

२०२२-२०२३ चा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ते हंगाम संपेपर्यंत वरील सर्व जातींचे खोडवे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच लागवडीखाली येणाऱ्या उसक्षेत्राच्या तोडणीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीला आडसाली हंगामातील कोसी -८६०३२ व पूर्व हंगामातील लवकर पक्व होणाऱ्या
कोव्हीएसआय -८००५ व एमएस १०००१ या जातीचे ७० टक्के लागण नोंद झालेले उसाचे क्षेत्र व कोएम-२६५ या जातीचे ३० टक्के क्षेत्राचे आडसाली हंगाम संपेपर्यंत प्राधान्याने गाळप करण्यात येणार आहे. तसेच आडसाली हंगामातील कोएम-२६५ या ऊस जातीचे क्षेत्र संपल्यानंतर पूर्व हंगामातील कोसी- ८६०३२ या जातीसोबत सुरू हंगामातील लवकर पक्व होणाऱ्या जातीचे क्षेत्र लागण नोंदीनुसार गाळप करण्यात येईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खोडवा पिकाचे प्रमाण वाढावे व पर्यायाने रिकव्हरीमध्ये वाढ होऊन त्याचा फायदा ऊस उत्पादक सभासदांना होण्याच्या उद्देशाने हंगाम २०२२-२०२३ मध्ये राखल्या जाणाऱ्या खोडव्याची १५ डिसेंबरपासून २० टक्क्याप्रमाणे तोड करण्यात येईल. यामध्ये कोसी-८६०३२, एमएस-१०००१, व्हीएसआय ८००५ व कोएम-२६५ या जातींच्या खोडव्याची क्रमवारीनुसार तोडणी करण्यात येणार आहे.

इतर उसजातींची लागवड करू नये
कारखान्याने सुचविलेल्या ऊस जातीव्यतिरिक्त इतर कोणत्याही ऊस जातीची सभासदांनी लागवड करू नये. इतर ऊस जातीची लागवड केल्यास त्याची नोंदणी, तोडणी व गाळपाची जबाबदारी कारखान्याची राहणार नाही.

पट्टा पद्धतीने ऊसलागवड करावी
उसतोडणी मजुरांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. उसाचे क्षेत्र वाढले असून, केन हार्वेस्टरने मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसलागवड ५ फूट पट्टा पद्धतीने करावी. तसेच उसलागण धोरणानुसार जादा रिकव्हरी असलेल्या उसाच्या जातींची लागवड करण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05257 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top