भवानीनगरच्या शिबिरामध्ये ३५० वारकऱ्यांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भवानीनगरच्या शिबिरामध्ये ३५० वारकऱ्यांची तपासणी
भवानीनगरच्या शिबिरामध्ये ३५० वारकऱ्यांची तपासणी

भवानीनगरच्या शिबिरामध्ये ३५० वारकऱ्यांची तपासणी

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ३० : सकाळ माध्यम समुहाचे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (इन) व यशश्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भवानीनगर (ता.इंदापूर) येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ३५० वारकऱ्यांची तपासणी करुन मोफत उपचार करण्यात आले.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यामध्ये पोहचला आहे. बुधवार(ता.२९) रोजी पालखी सोहळ्याचा मुक्काम सणसर गावामध्ये होतो. सकाळपासून वारकरी भवानीमध्ये दाखल झाले होते. येथील यशश्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले. वारकऱ्यांचा रक्तदाब, ऑक्सिजन, हृदयाच्या ठोक्यांची तपासणी करुन ईसीजी काढण्यात आला. तपासणीनंतर प्रत्येक वारकऱ्यांना मार्गदर्शन करून मोफत औषध उपचार करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी यशश्री हॉस्पिटलचे डॉ. राकेश मेहता व ''इन''चे पुणे ग्रामीणचे प्रतिनिधी सुजित मासाळ व त्यांच्या सहकार्यांनी सहकार्य केले.

भवानीनगरच्या शिबिरामध्ये ३५० वारकऱ्यांची तपासणी

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05335 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..