
काटेवाडीत रोखले पालखी मार्गाचे काम
वालचंदनगर, ता. २८ : बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये सुरु असलेले संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सातत्याने निकृष्ठ दर्जाचे सुरु असल्याने बारामती तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन काटेवाडी (ता.बारामती) गावामध्ये महामार्गाचे काम रोखून चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी केली.
बारामती-इंदापूर तालुक्यामध्ये सध्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे आरोप सातत्याने शेतकरी करीत आहे. सध्या बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरामध्ये महामार्गाचे काम सुरु आहे. महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. जमिनीतून माती काढून रस्त्याचे काम सुरू आहे. मातीचा थर संपल्यानंतर जमिनीमध्ये कठीण खडकाचा भाग लागेपर्यंत जमिनीचे उत्खनन करून त्यावर उत्कृष्ट दर्जा चा मुरूम टाकून रोलिंग करावयाचे आहे. मात्र, संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. निकृष्ठचा मुरूम टाकून रोलिंग करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार होणारा रस्ता खराब होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच ठेकेदाराने इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्याच्या बाजूच्या साईडगटरचे काम केले असून यावरती पुरसे पाणी न मारल्यामुळे साईडगटरच्या क्रॉक्रिंटीकरणाला भेगा पडू लागल्या आहेत. महामार्गालगतचे विद्युत पोल हलवले असून नव्याने बसवल्याने विद्युत पोलचेही काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजीराव होळकर यांनी तातडीने काटेवाडी मध्ये भेट देऊन कामाची पाहणी केली.यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.
---
02353
---
Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05378 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..