आनंदनगर ग्रामपंचायतीत रगंली चुरशीची निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदनगर ग्रामपंचायतीत
रगंली चुरशीची निवडणूक
आनंदनगर ग्रामपंचायतीत रगंली चुरशीची निवडणूक

आनंदनगर ग्रामपंचायतीत रगंली चुरशीची निवडणूक

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १ : इंदापूर तालुक्यातील आनंदनगर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नंदिकेश्‍वर ग्रामविकास पॅनेल व श्री दत्तकृपा ग्रामविकास परिवर्तन पॅनेल यांच्यामध्ये चुरशीची होणार आहे.
या ग्रामपंचायतीवर गेल्या पंचवार्षिकमध्ये मोहोळकर गटाची सत्ता होती. मोहोळकर हे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक असून, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते गावपातळीवर आघाडी करून नंदिकेश्‍वर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री दत्तकृपा ग्रामविकास परिवर्तन पॅनेल असून, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांनी एकत्र येऊन पॅनेल केला आहे. प्रभाग १ व प्रभाग ३ मध्ये अपक्ष उमेदवार आहेत.

नंदिकेश्‍वर ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार : प्रभाग १- सुधाकर ज्ञानदेव कणसे, शीतल नानासाहेब साळुंखे, ऋषिकेश मंगेश लोंढे. प्रभाग २- सीमा वसंत मोहोळकर, उद्धव ज्ञानदेव माने, इंताज नजीर शेख. प्रभाग ३- रोहित वसंत मोहोळकर, जयश्री मोहन कुंभार, सत्यभामा तुकाराम लोंढे.
श्री दत्तकृपा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे उमेदवार : प्रभाग १- अॅड. विकास बबन पवार, रूपाली विष्णू माने, प्रवीण अविनाश कसबे, प्रभाग २- सुयश मुकुंद चौधरी, कान्होपात्रा सिद्धनाथ माने, सुगराबी शब्बीर अहमद अलीम.
प्रभाग ३- विष्णू सिद्धनाथ माने, छाया सुभाष देसाई, रोहिणी रामचंद्र झोडगे. अपक्ष उमेदवार- दीपक मदन खरे व विजय सुबराव बनसोडे (प्रभाग १), विजयकुमार गंगाराम राखुंडे (प्रभाग ३).

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05390 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..