क्षारविरहित पाण्यावर घेतले लाखोंचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षारविरहित पाण्यावर घेतले लाखोंचे उत्पन्न
क्षारविरहित पाण्यावर घेतले लाखोंचे उत्पन्न

क्षारविरहित पाण्यावर घेतले लाखोंचे उत्पन्न

sakal_logo
By

वालचंदनगर ता. ७ : कळंब (ता.इंदापूर) येथील जय उत्तम फडतरे या युवकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून क्षारयुक्त पाण्याचे क्षारविरहित पाण्यामध्ये रूपांतर केले. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत योग्य नियोजन करून विविध पिके, शेवगा, पेरूच्या विक्रीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले. त्याने अल्पावधीच घेतलेली व्यवसायातील भरारी इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
जय उत्तम फडतरे याने उद्योग व्यवसायाबरोबर शेती व्यवसायात लक्ष घातले आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. जय फडतरे याचे मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असून सध्या एम.बी.ए.चे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. नोकरीच्या मागे न लागता शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यावसायिक शेती सुरू केली आहे. त्यांची कळंब -वालचंदनगर परिसरामध्ये शेती आहे. पॉलिहाऊस, नेट शेडमध्ये पिकांचे उत्पादन घेतले जाते. यातील दहा एकराच्या शेती परिसरातील पाणी क्षारयुक्त आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी १० एकरामध्ये शेवगा व पेरूची लागवड केली होती. मात्र क्षारयुक्त पाण्यामुळे शेवगा व पेरूचे झाडांची अपेक्षीत वाढ झाली नसल्यामुळे त्यांना काढून टाकावी लागली.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विहीर व बोअरवेल्सच्या पाण्यासाठी वॉटरकंडीशनर बसवला. यामुळे पाण्यातील क्षार कमी झाले त्याचा फायदा होऊन पिके चांगलीच बहरली.
दरम्यान, जय यांना दत्तात्रेय फडतरे, संगीता फडतरे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.

क्षारयुक्त पाण्याचे क्षार कमी करून क्षारविरहित पाणी विविध पिकांना देण्यास सुरुवात केली. सध्या दहा एकरातील क्षेत्रामध्ये ६ एकर शेवगा व ४ एकर मोसंबीची लागवड केली आहे. ६ एकर शेवग्याचे उत्पादन सुरू झाले असून शेवग्याला चांगला दर मिळत आहे. तसेच मोसंबीची रोपेही ही चांगली वाढली असून लवकरच मोसंबीपासून उत्पन्न मिळणार आहे.
- जय फडतरे, प्रगतशील युवा शेतकरी

कलर मिरचीतून ३० लाखांचे उत्पन्न
जय फडतरे यांनी २ एकरामध्ये शेड नेटमध्ये २७ ऑक्टोबर २०२१ मध्ये कलर मिरचीच्या २० हजार रोपांची लागवड केली होती. यासाठी २० ट्रॉली शेणखत घातले. मिरचीला २० रुपये प्रतिकिलो ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत उच्चांकी दर मिळाला होता. दोन एकरामध्ये सुमारे ५५ टन मिरचीचे उत्पादन घेतले असून ३० लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न घेतले.
तसेच ४ एकर टॉमेटो क्षेत्रामधूनही १२ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
--

02382

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05411 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..