अंथुर्ण्यात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंथुर्ण्यात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन
अंथुर्ण्यात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन

अंथुर्ण्यात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ३१ ः अंथुर्णे (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण कायम करून ग्रामपंचायत दप्तरी नोंद व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामपंचायतीसमोरच चूल पेटवून भाकरी भाजून आंदोलन केले.
शेती महामंडळामध्ये यापूर्वी काम करणाऱ्या रोजंदारी कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घरासाठी दोन गुंठे जागा मिळावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागणीची शासन स्तरावरून कोणतीही हालचाल होत नसल्याने या रोजंदारीवरील कामगार व त्यांच्या सुमारे १०० कुटुंबातील सदस्यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी अंथुर्णे गावालगतच्या गट नंबर ८८ /२ मधील दोन एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणास ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. ग्रामपंचायतीच्या विरोधामुळे नागरिकांनी मंगळवारी (ता. ३०) रोजी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी उपस्थित महिला व पुरुष आंदोलकांनी घोषणा देत ग्रामपंचायत प्रशासन व शासकीय यंत्रणांचा निषेध नोंदवला.


पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटविणार...
यासंदर्भात अंथुर्णेचे सरपंच लालासाहेब खरात यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवरती नागरिकांनी केलेले अतिक्रमण बेकायदेशीर आहे. त्यांनी जागेसाठी केलेली मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यासाठी ग्रामपंचायत देखील वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. मात्र, नागरिकांनी केलेले अतिक्रमण बेकायदेशीर असून ग्रामपंचायत मिळकतीचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. शासकीय यंत्रणा व पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटविणार असून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांवर व त्यांना मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05484 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..