महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार
महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १४ : ‘‘जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या घरी पाण्याचा नळ पोहचविण्याचे काम करणार असून, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कायमस्वरूपी उतरविणार आहे,’’ अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
निंबोडी (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, दीपक निंबाळकर, हनुमंत घोळवे, मनोज होडशीळ आदी उपस्थित होते.
यावेळी भरणे म्हणाले, ‘‘इंदापूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. राज्यात सत्ता असो अथवा नसो, इंदापूरचा विकास थांबणार नाही. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आहेत. त्यांच्या माध्यमातून इंदापूरला हवा तेवढा विकास निधी येणार असून, विकासाच्या बाबतीत नागरिकांनीही काळजी करू नये. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून देखील तालुक्याच्या विकासासाठी मोठी मदत होत आहे. भवानीनगर ते खडकी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या काम लवकरच सुरू होणार असून, तालुक्यातील विकासकामे वेगाने सुरु राहणार आहेत.’’

इंदापुरातील काही लोकांना तुमच्या पाण्याचे, विकासाचे काही देण-घेणे नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांना दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घ्यायचे आहे. स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून ते करत आहेत.
- दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री
WAL22B02502

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05537 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..