इंदापुरात गोगलगायींमुळे शेतकरी हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात गोगलगायींमुळे शेतकरी हैराण
इंदापुरात गोगलगायींमुळे शेतकरी हैराण

इंदापुरात गोगलगायींमुळे शेतकरी हैराण

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १५ : बोरी, लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरामध्ये शेतामधील पिकांवर गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढला आहे. गोगलगाई फळे, मुळे कुरतडत असल्याने नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
बोरीमधील वाघमोडवस्ती परिससरामध्ये उसाच्या शेतामध्ये गोगलगाय आढळत आहेत. तर बोरी गावातील संतोष जगताप यांच्या शेतामध्ये गोगलगायचे संख्या जास्त असून मिरचीच्या झाडांच्या मुळ्या खालल्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. अशीच परिस्थिती टॉमेटोच्या शेतामध्ये दिसून येत आहे. टॉमेटोच्या झाडावर चढून टॉमेटो कुरतडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. शेतकऱ्यांपुढे गोगलगायचे नवे संकट उभे राहिले असून शेतकरी चितांग्रस्त झाले आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये चालू वर्षी चांगला पाऊस झाला आहे. आज अखेर अंथुर्णे परिसरामध्ये ६१३ मिलिमिटर, सणसर परिसरामध्ये ४७५ मिलिमिटर, निमगाव केतकी परिसरामध्ये ६०७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सलगच्या पावसामुळे इंदापूर तालुक्यामध्ये गोगलगायींचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी अनेक औषधांच्या फवारणी करून ही गोगलगाय कमी होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यासंदर्भात इंदापूर तालुक्याचे कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बोरी परिसरामध्ये गोगलगाय असणाऱ्या ठिकाणी पाहणी करणार असल्याचे सांगितले.
---
गोगलगायीने मिरचीच्या झाडांच्या मुळ्या खालल्यामुळे नुकसान झाले आहे. ती पिकले टॉमेटो खात असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. औषधफवारणी करून ही गोगलगाय आटोक्यात येत नसल्यामुळे काय करावे ते समजत नाही.
- संतोष जगताप, शेतकरी, बोरी


02518

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05555 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..