जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी वहूर येथे मोफत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी 
वहूर येथे मोफत प्रशिक्षण
जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी वहूर येथे मोफत प्रशिक्षण

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी वहूर येथे मोफत प्रशिक्षण

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २७ ः पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींचा व्यक्तिमत्त्व विकास करून नोकरीची संधी उपलब्ध होण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतंर्गत मोफत नोकरीपूर्व कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील युवक -युवतींचा व्यक्तिमत्त्व विकास करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये हेल्थ केअर, इलेक्ट्रॅानिक्स अॅन्ड हार्डवेअर, आयटी क्षेत्रामधील कोर्सचा समावेश आहे. सदरचे प्रशिक्षण निवासी असून तीन महिन्याचे आहे. यामध्ये राहण्याची, भोजनाची मोफत व्यवस्था आहे. महिलांसाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये रोजच्या कामाचा अनुभव मिळणार असून युवक -युवतींच्या वैयक्तिक गुणांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्र शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळणार आहे.

कशाचे प्रशिक्षण घेता येणार - हेल्थ केअर, इलेक्ट्रॅानिक्स अॅन्ड हार्डवेअर, आयटी क्षेत्रामधील कोर्स.
प्रशिक्षण ठिकाण - फंजदार हायस्कूल वहूर (ता. महाड, जिल्हा रायगड)
प्रशिक्षण कालावधी- तीन महिने
मोफत संगणक प्रशिक्षण व इंग्लिश स्पिकींगची सोय उपलब्ध.
नाव नोंदणीसाठी संपर्क-९०२८३६५४९९