विजेच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू औरंगाबाद डिस्टलरीमधील कामगारांना वीजेचा झटक्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू
औरंगाबाद डिस्टलरीमधील कामगारांना वीजेचा झटक्याने मृत्यू
विजेच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू औरंगाबाद डिस्टलरीमधील कामगारांना वीजेचा झटक्याने मृत्यू

विजेच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू औरंगाबाद डिस्टलरीमधील कामगारांना वीजेचा झटक्याने मृत्यू

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १३ : रणगाव गावच्या (ता.इंदापूर) हद्दीतील औरंगाबाद डिस्टलरीमधील कंपनीमध्ये दोन कामगारांना विजेचा शॉक लागल्याची घटना घडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक जण गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या सुपरवायझर व वायरमनवर कामगाराचा हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे सुपरवायझर मुकुंद घारगे व वायरमन धनवडे (पूर्ण नाव दाखल नाही) या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये सलीम दिलावर शेख (वय ३०,रा. रणगाव) या कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला असून नीलेश अभिमन्यू गायकवाड (वय -३०, रा. साळुंखेवस्ती, रणगाव ता.इंदापूर) हे जखमी झाले आहेत. सलीम शेख व अभिमन्यू गायकवाड हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता. १३) कंपनीमध्ये पहाटे ४ वाजता कामावर गेले होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुपरवायझर घाडगे यांनी शेख व गायकवाड या कंपनीतील केम विभागातील कामगारांना नियमितच्या कामाव्यतिरिक्त विजेचा हाय पॉवर सप्लाय असलेला पॅनेल बॉक्सची सफाई करण्यास सांगितले. कामगारांनी विजेचा मेन स्वीच बंद करण्यास वायरमन घाडगे यांनी सांगितले होते. तसेच दोघांनाही कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे दिली नसल्यामुळे व पॅनेल बॉक्समधील वीज बंद केली नसल्यामुळे सलीम शेख व अभिमन्यू गायकवाड यांना विजेचा धक्का लागला. यामध्ये शेख यांचा मृत्यू झाला तर गायकवाड यांच्यावर वालचंदनगरमध्ये खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमी कामगार नीलेश गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.