पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुराच्या पाण्यातून  धोकादायक प्रवास
पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १८ निरवांगी (ता.इंदापूर) जवळील निरवांगी-खोरोची रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाचे पाणी व नीरा नदीच्या फुगवट्याचे पाणी पुलावरून वाहते. जीव धोक्यात घालून नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत असून पुलाची उंची वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
इंदापूर तालुक्यातील च्या पश्‍चिम भागामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची,नागरिकांनी दाणादाण उडाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले.पावसामुळे ओढे-नाले तुंडूब भरून वाहत होते. निरवांगी-खोरोची रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने सोमवारच्या पावसाचे पुलावरून पाणी वाहू लागले.सकाळी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाच्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून शाळेत यावे लागले. तसेच दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांनाही पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला. पुलाची उंची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत असून पुलाची उंची वाढविण्याची मागणी निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ,दत्तात्रेय पोळ,बाळासाहेब गायकवाड,खोरोचीचे दादासाहेब भाळे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.

02640