कळसमध्ये २७ लाखांची फसवणूक; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसमध्ये २७ लाखांची
फसवणूक; दोघांना अटक
कळसमध्ये २७ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

कळसमध्ये २७ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

sakal_logo
By

वालचंदनगर ता. २१ ः कळस (ता. इंदापूर) येथील जयहिंद फिड्स कंपनीची २७ लाख ९७ हजार ४३४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली.
मच्छिंद्र आजिनाथ कदम व देविदास कुबेर कदम (रा. दोन्ही रा. सुरली टेभुंर्णी, ता. माढा जि. सोलापुर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र कदम हा २०२० पासून जयहिंद फिड्समध्ये काम करतो. त्याच्याकडे मोहोळ व माढा या दोन तालुक्यांची कॅटलफीड विभागाची जबाबदारी होती. त्याने ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२१ या काळात ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेऊन कंपनीकडे पैशाचा भरणा केला नाही. चुलत भाऊ देविदास कुबेर यालाही माल विकला होता. विकलेल्या मालाचे २७ लाख ९७ हजार ७३४ रुपये कंपनीकडे जमा न करता फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जयहिंद फिड्स विनोद पांडुरंग गायकवाड (रा. लासुर्णे) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.