मेंढ्याच्या कळपामध्ये घुसला भरधाव ट्रॅंकर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढ्याच्या कळपामध्ये 
घुसला भरधाव ट्रॅंकर!
मेंढ्याच्या कळपामध्ये घुसला भरधाव ट्रॅंकर!

मेंढ्याच्या कळपामध्ये घुसला भरधाव ट्रॅंकर!

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २९ : चिखली (ता. इंदापूर) येथे रस्त्याच्या एका बाजूने चाललेल्या मेंढपाळाच्या कळपामध्ये भरधाव वेगाने जाणारा टँकर घुसल्याने तीन मेंढराचा जागीच मृत्यू झाला असून, आठ मेंढरे गंभीर जखमी झाले आहेत.
चिखलीमधील शेतकरी मारुती सोपान डोंबाळे हे शनिवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बारामती-कळंब-बावडा-नीरा-नरसिंगपूर (बीकेबीएन) रस्त्यावरून मेंढरे घरी घेऊन चालले होते. त्यावेळी कळंब बाजूकडून बीकेबीएन रस्त्याने बारामतीकडे भरधाव जात असलेला दुधाचा टॅंकर अचानक मेंढराच्या कळपामध्ये घुसला. या अपघातामध्ये तीन मेंढरांचा जागीच मृत्यू झाला असून, सात-आठ मेंढरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विश्‍वजित तावरे यांनी तातडीने पुढाकार घेऊन सर्वांशी चर्चा करीत होते.