लाकडी येथे बंद घरातून ७३ हजारांच्या ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाकडी येथे बंद घरातून ७३ हजारांच्या ऐवज लंपास
लाकडी येथे बंद घरातून ७३ हजारांच्या ऐवज लंपास

लाकडी येथे बंद घरातून ७३ हजारांच्या ऐवज लंपास

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ३ : लाकडी (ता.इंदापूर) येथून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शोभा अंकुश साबळे (वय ३९, रा. मुळ रा. मळेगाव, ता. शेवगाव जि. नगर, हल्ली, रा. लाकडी) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान लाकडीमधील साबळे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप टॉमीच्या मदतीने उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याच्या चार अंगठी, बदाम, नथ, चांदीची जोडव्यासह १२ हजार रुपये रोख रक्कम असा ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून, तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अजित थोरात करीत आहेत.