
बेलवाडीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये सरळ लढत
वालचंदनगर, ता. १३ : इंदापूर तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये चुरशीची होणार आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये बेलवाडी हे महत्त्वाचे गाव असून, सणसर-लासुर्णे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायती समिती तसेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये गावाची महत्त्वाची भूमिका असते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतिलाल जामदार यांची सून व नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांची मुलगी नीता मयूर जामदार या राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री ज्योर्तिलिंग ग्रामविकास पॅनेलमधून सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणातआहे. तर, भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांची पत्नी मयूरी या भाजप पुरस्कृत श्री ज्योर्तिलिंग परिवर्तन पॅनेलमधून सरंपचपदासाठी निवडणूक लढवत आहेत. या सरळ लढतीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच, सदस्यपदासाठी तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पॅनेलनिहाय उमेदवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री ज्योर्तिलिंग ग्रामविकास पॅनेल- नीता मयूर जामदार (सरपंचपदासाठी), प्रभाग- १ अनिता हनुमंत खैरे, प्रदिप महादेव भिसे, दादासाहेब संभाजी गायकवाड. प्रभाग २- मनीषा सागर जामदार, दीपाली सूरज भिसे. प्रभाग ३- दादासाहेब जगन्नाथ सावंत, वंदना अशोक जामदार.
प्रभाग ४- पंकज सर्जेराव जामदार, अजित हनुमंत पवार, सविता राजेंद्र जामदार. प्रभाग ५- नामदेव शिवाजी इतापे, स्वाती नानासाहेब पवार, सोनाली गणेश गणगे.
भाजपपुरस्कृत ज्योर्तिलिंग परिवर्तन पॅनेल- मयूरी शरद जामदार (सरपंचपदासाठी). प्रभाग १- प्रियांका सुशांत जामदार, महेश शिवलाल भोसले, सुरेश चंद्रकांत भिसे. प्रभाग २- अंबिका हनुमंत यादव, सुप्रिया सागर गायकवाड. प्रभाग ३- अनिल मधुकर खैरे, स्नेहल संजय पवार. प्रभाग ४- विनायक भाऊराव जामदार, सुजाता विजय पवार, प्रताप मोहन पवार. प्रभाग ५- सुधीर साहेबराव पवार, स्वाती जोतिराम जामदार, सुप्रिया विशाल करंजकर.
अपक्ष उमेदवार- प्रभाग १- चेतना प्रकाश खैरे. प्रभाग ४- रोहन युवराज थोरात. प्रभाग ५- ज्ञानदेव जोतिराम जामदार.