पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ अंथुर्णे येथे रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ  
अंथुर्णे येथे रास्ता रोको
पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ अंथुर्णे येथे रास्ता रोको

पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ अंथुर्णे येथे रास्ता रोको

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १३ : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करून निषेध केला.
अंथुर्णे येथे ग्रामस्थांनी सोमवारी (ता. १२) सायंकाळी सुमारे एक तास इंदापूर-बारामती राज्यमार्गावर रास्ता रोको करून निषेध केला. यामध्ये अंथुर्णे व भरणेवाडी परिसरातील सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या वेळी ॲड. बापूराव साबळे, अमर बोराटे, प्रवीण साबळे, अंबादास साबळे यांनी मनोगत व्यक्त करून निषेध नोंदवला.
वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके यांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आबासाहेब भरणे, सरपंच लालासाहेब खरात, गुलाब म्हस्के, दत्तात्रेय गायकवाड, राघू गायकवाड, बाळू वाघ, विशाल साबळे, अंकुश भुजबळ, शेखर काटे आदी उपस्थित होते. तसेच, मंगळवारी (ता. १३) अंथुर्णेमध्ये कडकडीत बंद पाळण्‍यात आला.