श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे वेतनेतर अनुदान थांबविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे 
वेतनेतर अनुदान थांबविले
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे वेतनेतर अनुदान थांबविले

श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे वेतनेतर अनुदान थांबविले

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १४ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे वेतनेतर अनुदान वितरित केले जाणार नसल्याचा आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिला.
वैजयंतीमाला विलासराव शेलार (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी शिक्षण संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. १० ऑक्टोबर २०२२ रोजी न्यायालयाने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना कार्यवाही करणेबाबतचा अंतिम आदेश दिला होता. मात्र, तरीही संस्थेने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे १३ डिसेंबर २०२२ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वाखारे यांनी संस्थेला वितरित केले जाणारे वेतनेतर अनुदान याचिकेचा निर्णय होईपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.