फडतरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फॉर्मासिटीकल कंपनीला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फडतरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फॉर्मासिटीकल कंपनीला भेट
फडतरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फॉर्मासिटीकल कंपनीला भेट

फडतरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फॉर्मासिटीकल कंपनीला भेट

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १९ : कळंब (ता.इंदापूर) येथील लक्ष्मीबाई फडतरे फार्मसी कॉलेजमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी पुण्यातील फॉर्मासिटीकल कंपनीला भेट देवून औषधनिर्माण क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
कॉलेजच्या वतीने बी.फार्मसी द्वितीय वर्ष व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी औषध बनविण्यास कंपनीला भेट देण्याचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी पुण्यातील एमएजीएस आयएटीआरसी संशोधन व प्रशिक्षण कंपनीला भेट दिली. कंपनीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. औषधे तयार कशी करतात याची माहिती घेऊन फार्मासिस्टचे फार्मा कंपनीतील उपकरणाचे महत्त्व, कार्य, औषधे परिक्षण विभाग, औषधे बनविणारी यंत्रसामुग्री, गुणनियंत्रण व लॅबची सखोल माहिती घेतली.
यावेळी कंपनीचे संचालक डॉ. संदेश काटे व गोविंद देशपांडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या भेटीचे आयोजक केले होते.

02786