इंदापूरच्या पश्‍चिम भागात महिलांची उर्त्स्फूतपणे हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरच्या पश्‍चिम भागात महिलांची उर्त्स्फूतपणे हजेरी
इंदापूरच्या पश्‍चिम भागात महिलांची उर्त्स्फूतपणे हजेरी

इंदापूरच्या पश्‍चिम भागात महिलांची उर्त्स्फूतपणे हजेरी

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १८ इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शांततेत मतदान पार पडले. थेट जनतेमधून सरपंच निवड असल्याने गावोगावी चुरस निर्माण झाली होती. अटीतटीची लढती असल्याने महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानाला हजेरी लावली.
तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी, बेलवाडी, थोरातवाडी, रणगाव, कुरवली, जांब, मानकरवाडी व न्हावी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान झाले.
बेलवाडी, बोरी, थोरातवाडी गावामध्ये सरपंचपदासाठी चुरशीची लढत होती. रणगाव, कुरवली, मानकरवाडी, जांब, न्हावी गावामध्ये चुरशीची निवडणूक झाली. बेलवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत व भाजपपुरस्कृत पॅनेल यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली होती. दोन्ही पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बोरीमध्येही रंगतदार निवडणूक झाले. बेलवाडी गावामध्ये ४२३१ मतदारापैकी ३५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर बोरी गावामध्ये ४८६१ मतदारापैकी ३७४८ मतदारांनी मतदान केले. मानकरवाडीमध्ये ९५० मतदारापैकी ८०० नागरिकांनी मतदान केले. कुरवली गावामध्ये २११२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जांब, रणगावमध्ये शांततेमध्ये मतदान झाले.