रणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रणगाव ग्रामपंचायतीवर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा
रणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

रणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २१ ः रणगाव (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ब्रम्हंनाथ ग्रामविकास पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेल श्री ब्रम्हंनाथ परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवून सरपंचपदासह ६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजप पुरस्कृत पॅनेलला ४ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार योगेश कैलास खरात यांनी भाजप पुरस्कृत सरपंचपदाचे उमेदवार हनुमंत हरिश्‍चंद्र गायकवाड यांचा ४३५ मतांच्या फरकांनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला.
गेल्या पंचवार्षिकमध्ये रणगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गावाच्या राजकारणामध्ये बदल झाला. भाजप पुरस्कृत पॅनेलमधून निवडून आलेले सरपंच व काही सदस्य राष्ट्रवादीमध्ये गेले. माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून रणगावमधील अनेक विकासकामे मार्गी लागली. याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून आला. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवाराला मतदारांनी भरभरून मते दिली. ४३५ मतांच्या फरकांनी योगेश खरात विजयी झाले. तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे ६ सदस्य निवडून आले असून भाजप पुरस्कृत पॅनेलचे ४ सदस्य व १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत ब्रम्हंनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार ः सरपंच- योगेश कैलास खरात, सदस्य- राहुल दशरथ रणमोडे, दीपाली महेंद्र सावंत, वनिता संजय गायकवाड, शहानुरा मुख्तार शेख, संदीप रामचंद्र गोसावी, कोमल सौरभ पवार (बिनविरोध)
भाजप पुरस्कृत श्री ब्रम्हंनाथ परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार ः मयूरी जगन्नाथ बोंद्रे, रोहित राजेंद्र गायकवाड (बिनविरोध), मारुती दत्तात्रेय रणमोडे, उषा संतोष साबळे
दादासाहेब एकनाथ तुपे (अपक्ष)