कळंबमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कळंबमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

वालचंदनगर, ता. २ : कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंद विद्यालय व श्री वर्धमान विद्यालयामध्ये १९९१ ते १९९६ या कालावधीमध्ये इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे २७ वर्षानंतर आयोजन केले होते. यावेळी ९३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

स्नेहमेळाव्यास राष्ट्रगीताने प्रारंभ झाला. यावेळी ३० वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील एकमेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाने आपली ओळख सांगून सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्राची माहिती सांगितली.


कार्यक्रमास विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे, श्री वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य अरुण निकम, वालचंदनगर विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सर्वगौड, डॉ. दिलीप कुटे, प्रा. महादेव कदम, डॉ. विलास बुवा, बाळासाहेब जाधव, रामदास शेलार उपस्थित होते.

मेळाव्याचे आयोजन सुभाष गायकवाड, मनोज देवडीकर, संजय माने, उदय बर्गे, नितीन बल्लाळ, अरुण शेंडे, सुनील भोसले, बाळासाहेब शिंदे, नितीन कुलकर्णी, भरत भगत, संतोष रणसिंग, योगेश तपकीरे, जगदीश रणवरे, राजेंद्र शिनगारे, अप्पासाहेब मानकरी, राजश्री साळवे, मंगल काकडे, निलीमा कांबळे, शंकर रणसिंग, संजय नकाते यांनी केले. उदय बर्गे, भरत भगत यांनी सूत्रसंचालन केले.

माजी विद्यार्थ्यांची देश-विदेशामध्ये नोकरी
स्नेहमेळाव्यात डॉ.अंकुश आहेर यांनी सांगितले की, २५ ते ३० वर्षापूर्वीची शैक्षणिक परिस्थिती वेगळी होती. आज आमूलाग्र बदल झाला आहे. वालचंदनगर व कळंब परिसरामध्ये विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंद विद्यालय, श्री वर्धमान विद्यालय, भारत चिल्डन्स अॅकॅडमी, फडतरे नॉलेज सिटी सारखी शैक्षणिक संकुले आहेत. येथे शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशामध्ये नोकरी करीत आहेत.
----

02945

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com