Sat, June 3, 2023

अपघात केलेले वाहन पोलिसांनी केले जप्त
अपघात केलेले वाहन पोलिसांनी केले जप्त
Published on : 24 February 2023, 1:10 am
वालचंदनगर, ता. २४ : जंक्शन (ता. इंदापूर) येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना धडक देवून पळून गेलेल्या चालकाला वालचंदनगर पोलिसांनी लातुरमधून ताब्यात घेतले असून त्याच्याकडील वाहन जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विकास तुकाराम गुरमे (रा.लातुर) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेमध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा.आनंदनगर) यांचा अपघात झाल्यामुळे बुधवार (ता.२२) मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पाेलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, दादासाहेब डोईफोडे, गुलाब पाटील यांनी गाडीचा शोध घेतला.